श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सौरभ चौधरी
आझाद चौकातील मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर; कीर्तन, महाभंडारा अन् व्यसनमुक्ती अभियानासह विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन
पारोळा प्रतिनिधी
पारोळा : शहरातील आझाद चौक परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या सभासदांच्या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत उत्सवाचे नियोजन, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, युवकांचा सहभाग तसेच परिसरातील नागरिकांना उत्सवाशी जोडून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सौरभ चौधरी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. महेश चौधरी (भोला) यांची उपाध्यक्षपदी, तर प्रसाद चौधरी यांची सचिवपदी निवड झाली. बापू मराठे व मनोज चौधरी (बंटी) यांच्यावर खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
अनुभवी कार्यकर्त्यांची सल्लागार समिती
मंडळाच्या सल्लागार समितीत सोनू मराठे, छोटू वाणी, योगेश सुदाम चौधरी, गणेश बारी, विकास चौधरी, विपुल चौधरी, विकी गोसावी, सचिन शालिक चौधरी, गोलू, रवींद्र चौधरी, गोपाल चौधरी, गणेश चौधरी, जयेश, नितीन चौधरी, नाना ठाकूर, दर्शन बागुल, महेश चौधरी, स्वामी चौधरी, सोनू चौधरी, दीपक चौधरी, सचिन चौधरी, उज्वल चौधरी, योगेश राजेंद्र चौधरी व भावडू चौधरी यांचा समावेश करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीची घोषणा होताच उपस्थित सभासद, पदाधिकारी, युवक व गणेशभक्तांनी नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यंदाचा गणेशोत्सव भव्य, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कीर्तनासह संपूर्ण पारोळ्यासाठी महाभंडारा
यंदाच्या गणेशोत्सवात केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कीर्तनाचे आयोजन, संपूर्ण पारोळा शहरासाठी महाभंडारा तसेच विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.
विशेषतः युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्तीचा संदेश देणारे उपक्रम, जनजागृती आणि समाजप्रबोधन कार्यक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचा उत्सव ठरावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिवरायांच्या विचारांचा आदर्श; युवक संघटनाला प्राधान्य
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून मंडळाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, युवकांचे संघटन, समाजोपयोगी कार्य आणि नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला.
गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील नागरिक, युवक, महिला व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मंडळाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
व्यायामशाळेच्या सभासदांसह युवकांची मोठी उपस्थिती
या बैठकीस श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे सभासद, मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुणाल मराठे, पवन चौधरी, पवन पाटील, रोहित चौधरी, रुपेश चौधरी, राहुल चौधरी, ओम ईश्वर चौधरी, खुशाल चौधरी, ओम पिंटू चौधरी, पंकज चौधरी, राज पाटील, तेजस भगवान चौधरी, दर्शन वाणी, जयेश चौधरी, यश चौधरी (उर्फ शेरा), साई चौधरी, शुभम चौधरी, नयन गोसावी, धीरज चौधरी, भिमा चौधरी व संदीप चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू मराठे यांनी केले.
आझाद चौकात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग
नवीन कार्यकारिणीची निवड झाल्याने आझाद चौक परिसरात गणेशोत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे. धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक बांधिलकी, युवकांमध्ये जनजागृती, व्यसनमुक्तीचा संदेश, समाजप्रबोधन आणि नागरिकांचा सहभाग यामुळे यंदाचा गणेशोत्सव सामाजिक एकोप्याचे आणि सेवाभावाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
