नशिराबाद : स्वयंशोध फाउंडेशन, नशिराबाद यांच्या वतीने ‘वीरांना वंदन – वीर पत्नी सन्मान सोहळा’ हा भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान करून त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात एकूण नऊ वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. सन्मानित वीर पत्नी मेघा दीपक शिंदे, अनिता नवनीत पाटील, निर्मला देवीदास महाले, भारती जितेंद्र कोल्हे, रत्नमाला सदाशिव सोनवणे, शितल नितीन पाटील, फरीदा उस्मान शेख, ज्योत्स्ना अशोक अहिरे आणि विजया चेतन हजारे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक जिल्हाध्यक्ष ईश्वर दादा मोरे होते. यावेळी संकल्प अकॅडमीचे संचालक विशाल पाटील, नशिराबाद नगरपरिषदेची नगरसेवक चेतन बराटे, मनोज पाटील उपनगराध्यक्ष पंकज महाजन, मनसे जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण प्रथमेश मुख्याध्यापक प्रवीण महाजन सर माध्यमिक चे उपशिक्षक डी एन पाटील ,राजू पाचपांडे सर,पोलीस मित्र तालुका अध्यक्ष अर्चना रोटे तसेच पत्रकार मंचाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात बालकलाकारांनी गीत गायन, नृत्य आणि वकृत्व सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंशोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, सचिव धीरज सैतवाल तसेच सदस्य महेश सपकाळे, चेतन सपकाळे, सागर धोबी आणि विशाल सावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज सैतवाल यांनी केले, प्रास्ताविक योगेश कोलते यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन चेतन सपकाळे यांनी केले.
हा कार्यक्रम देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला आणि उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारा ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली..
