आरक्षण सोडतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना साधा चहाही नाही
तहसीलदार मॅडम यांची नाराजी
जळगाव : जळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत तालुक्यातून आलेले आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांना साधा चहादेखील देण्यात न आल्याने तहसीलदार मॅडम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
पंचायत समिती परिसरात चर्चेला उधाण
या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगराज भाऊ सपकाळे, देऊळवाडा येथील सरपंच मुकेश भाऊ सोनवणे, प्रवीण भाऊ सपकाळे, आवाचे मनोज चौधरी, कानकवाड्याचे माजी सरपंच पुंडलिक सपकाळे, प्रा. पांडुरंग पाटील धानवड आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर तहसीलदार मॅडम यांनी पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकाऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली. “एवढा वेळ बसूनही आम्हाला साधा चहा सुद्धा पाजण्यात आला नाही, हे बरोबर नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
या प्रकारानंतर पंचायत समिती परिसरात काही काळ कुजबुज व चर्चेला उधाण आले. बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चहापानाच्या व्यवस्थेवरून प्रशासनातील नियोजनाचा अभाव समोर आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
