साळवा येथील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितू मराठे यांचा पुढाकार
पाळधी/धरणगाव/जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : गावाच्या विकासासोबत समाजकारणात तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पुढे येऊन जनसेवेचे काम करावे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या तरुणांच्या सामाजिक कार्याला पक्षाच्या माध्यमातून बळ देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील साळवा येथील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पाळधी येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात नवप्रवेशितांचे भगवा शेला घालून स्वागत करण्यात आले. युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारणे येथील माजी सरपंच जितू मराठे यांनी या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला.

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी तरुणाई ही गावाच्या विकासातील महत्त्वाची शक्ती असल्याचे नमूद केले. राजकारणासोबत समाजकारणाची नाळ कायम ठेवून गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा आणि विकासाची कामे गावागावांत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नवप्रवेशितांचा सामाजिक कामाचा निर्धार
शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांनी पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार गावातील सामाजिक आणि विकासाशी संबंधित प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच साळवा परिसरातील आणखी युवकांना सामाजिक कार्याच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यांचा झाला प्रवेश
प्रवीण रामलाल पाटील, गणेश प्रकाश पाटील, तुषार पुंडलिक पाटील, हिलाल माधव पाटील, डॉ. संजय हिलाल पाटील, महेंद्र वसंत पाटील, परेश नरेंद्र पाटील, वरुण धीरज नारखेडे, दीपक धनराज पाटील, योगेश सुकदेव पाटील, समाधान अशोक पाटील, चंद्रकांत मुरलीधर सोनार आणि अरुण विक्रम पाटील यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, उपजिल्हाप्रमुख रवींद्र कापडणे, स्वीय सहायक हेमंत नारखेडे (बंडूदादा), अभिजित पाटील, नवलराजे पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रतापराव पाटील यांनी केले, तर आभार जितू मराठे यांनी मानले.
