मध्य विधानसभा मतदारसंघात आजाद समाज पार्टीत कार्यकर्त्यांचा प्रवेश; नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
छत्रपती संभाजीनगर मध्य व पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सहभाग; संघटन बळकटीवर भर
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी :
आजाद समाज पार्टी (कांशीराम) मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्य व पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲड. चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे तसेच जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली मध्य विधानसभा मतदारसंघात हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपैकी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकारी
-
राहुल जाधव — विधानसभा अध्यक्ष, मध्य
-
अरुण पगारे — विधानसभा प्रभारी, मध्य
-
शेख रुमान — शहर उपाध्यक्ष
-
विजय मोरे — वार्ड अध्यक्ष, भीमनगर
-
मजर शेख — वार्ड अध्यक्ष, नारेगाव
-
जावेद अख्तर — वार्ड अध्यक्ष, हरसूल
-
प्रशिक वाकळे — युवा अध्यक्ष, पश्चिम विधानसभा
-
सागर साळवे — युवा प्रभाग अध्यक्ष
-
विजय केशवे — वार्ड उपाध्यक्ष, इंदिरानगर
-
ऋतिक कदम — वार्ड सचिव, इंदिरानगर
संघटन विस्तारावर भर
कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे, मराठवाडा कार्याध्यक्ष तातेराव ससाणे, जिल्हा प्रभारी राहुल साबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, युवा जिल्हाध्यक्ष अनामि मोरे, शहर अध्यक्ष शेख जावेद, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष शेख अजहर, शहर सचिव अमोल सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरविंद कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वसामान्य, वंचित, दलित आणि मुस्लिम समाजातील नागरिकांमध्ये पक्षाबाबतचा सहभाग वाढत असल्याचा दावा केला. आगामी काळात शहर व विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
आजाद समाज पार्टीने महाराष्ट्रात संघटनात्मक विस्तारासाठी विविध पदांवर नियुक्त्या करण्याचा क्रम सुरू ठेवला आहे.
