ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्ह्यातील १८ वर्षीय युवक दोन दिवसांपासून बेपत्ता
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील आवेश शेखचा शोध सुरू; माहिती मिळाल्यास दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे कुटुंबीयांचे आवाहन
सोयगाव | प्रतिनिधी – शिवराम जाधव
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या धानोरा येथील आवेश शेख वसीम (वय अंदाजे १८ ते १९ वर्षे) हा युवक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी परिसरात शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.
घरातून बाहेर पडला, मात्र परतलाच नाही
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आवेश शेख हा बारावीचे शिक्षण घेत असून, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. नातेवाइकांनी तसेच परिचितांनी विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
बेपत्ता युवकाचे वर्णन
-
नाव: आवेश शेख वसीम
-
वय: अंदाजे १८ ते १९ वर्षे
-
शिक्षण: बारावी
-
मूळ गाव: धानोरा, ता. चोपडा, जि. जळगाव
-
रंग: गोरा
-
उंची: अंदाजे ५ ते ६ फूट
-
शेवटचा पोशाख: हलक्या रंगाचा शर्ट
माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधा
आवेश शेख याच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
संपर्क क्रमांक :
-
वसीम शेख (वडील) : 8390682864
-
शारुख शेख, गाव किन्ही : 9922033662
-
विजय निकम, सोयगाव : 9673060335
या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात खबर देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विजय निकम यांनी केले आहे.
