गाढोदे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सतरावे पुष्प संपन्न
‘बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये’ विषयावर जयपाल धुरंधर गुरुजी यांचे अभ्यासपूर्ण प्रबोधन; उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
गाढोदे, ता. जळगाव | प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुक्याच्या वतीने गाढोदे येथे आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सतरावे पुष्प उत्साहात संपन्न झाले. या वेळी बौद्धाचार्य तथा जळगाव तालुका पर्यटन सचिव आयु. जयपाल धुरंधर गुरुजी यांनी ‘बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये’ या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबोधन केले.
बौद्ध धम्म मानवकल्याणाचा मार्ग
प्रवचनादरम्यान आयु. जयपाल धुरंधर गुरुजी यांनी बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये आणि मानवकल्याणातील त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. बौद्ध धम्म हा मानवाच्या कल्याणाचा मार्ग असून, त्यातील विचार आणि तत्त्वे मानवी जीवनाला योग्य दिशा देतात, असे त्यांनी आपल्या प्रबोधनातून स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षिका आयु. ज्योतिताई भालेराव, जिल्हा कार्यालयीन सचिव आद. सुषमाताई इंगळे, जळगाव तालुका महिला शाखेच्या कोषाध्यक्ष आद. वंदनाताई वानखेडे, जळगाव तालुकाध्यक्ष आयु. राजेश इंगळे, बौद्धाचार्य आद. गौतम सपकाळे, माजी श्रामणेर आद. आधारअण्णा सपकाळे, आद. समिंदर सपकाळे व आद. संतोष सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच आद. हिरामण लटकन सपकाळे, आद. मधुकर भवानी सपकाळे, गाढोदे महिला ग्राम शाखेच्या अध्यक्ष आद. कविताताई सपकाळे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने कार्यक्रमात सहभाग घेतला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
या धम्म प्रवचन कार्यक्रमाला परिसरातील श्रद्धावान बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. गौतम सपकाळे यांनी केले, तर आयु. समिंदर सपकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
