कपिलेश्वर नवदुर्गा मंडळात दांडियाचा जल्लोष; भुसावळात प्रथमच करणी मातेची घटस्थापना!
करणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पारंपरिक वेशभूषेतील महिला व तरुणाईने दांडिया-गरब्याच्या तालावर धरला ठेका
भुसावळ | संघरत्न सपकाळे
नवरात्रोत्सवानिमित्त भुसावळ शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित दांडिया महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे भुसावळ शहरात प्रथमच करण्यात आलेली करणी मातेची घटस्थापना. करणी मातेच्या दर्शनासाठी तसेच घटस्थापनेच्या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
करणी माता व आदिशक्तीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात करणी माता आणि माता आदिशक्ती यांच्या पूजनाने व मुख्य आरतीने करण्यात आली. त्यानंतर दांडिया आणि गरबा महोत्सवाला प्रारंभ झाला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला आणि तरुणाईने देवीचा जयघोष करत संगीताच्या तालावर ठेका धरला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजन
दांडिया महोत्सव यशस्वी करण्यासाठी जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष दामोदर राजपूत, उपाध्यक्ष राकेश तळेले, सचिव पवन तेली यांच्यासह वीरेंद्र राजपूत, आनंदा पाटील, प्रदीप पाटील, नितीन पाटील, गोपाल चौधरी, अतुल वायकोळे, हितेश भोळे, कनक पाटील, बालचंद कनोजिया, मुरली लोखंडे, बबन नावडे, वैभव भारंबे, संजय निळे, अक्षय कचवे, प्रवीण वळस्कर, विजय झोपे, दीपक पाटील, भूषण पाटील, भरत पाटील, गणेश पाटील आणि राजू माळी यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग
दांडिया महोत्सवात महिला वर्गाचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. सारिका पाटील, राजश्री पाटील, रुपाली चौधरी, हर्षाली पाटील, दीपाली तेली, मीना राजपूत, जयश्री राजपूत, संगीता पाटील, अर्चना पाटील, श्रद्धा पाटील, अक्का पाटील, सविता पाटील, स्मिता पाटील, सुनीता कनोजिया, चैताली झोपे, रंजना पाटील, सोनाली बनसोडे, नीलिमा तळेले, मोहिनी वायकोळे, शीतल भोळे, शीतल कांडेलकर, रीता निळे, योगिता भारंबे, आशा नावडे, शोभा लोखंडे आणि संगीता अटवाल यांच्यासह शेकडो महिलांनी दांडिया खेळत महोत्सवाची रंगत वाढवली.
भुसावळ शहरात प्रथमच झालेली करणी मातेची घटस्थापना आणि त्यानिमित्त रंगलेला दांडिया महोत्सव यामुळे नवरात्रोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहाचा संगम साधणारा हा सोहळा भुसावळकरांसाठी लक्षवेधी ठरला.
