सुभाष बाजीराव तायडे यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती
शाल, श्रीफळ देऊन सत्कार; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदनाचा वर्षाव
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव तालुका तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेले आदरणीय सुभाष बाजीराव तायडे यांची जिल्हा महसूल कार्यालयात नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीनिमित्त त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुभाष तायडे यांच्या पदोन्नतीनिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे माजी पूर्व जिल्हाध्यक्ष आदरणीय शैलेंद्रजी जाधव, माजी तालुकाध्यक्ष आदरणीय जगदीशभाऊ सपकाळे, आदरणीय आ. बा. सपकाळे गुरुजी, आदरणीय रविंद्र बिराडे आणि आदरणीय पवनभाऊ तायडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तायडे यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या पदोन्नतीबद्दल आनंद व्यक्त करत उपस्थितांनी त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
