जळगाव खुर्दमध्ये महावितरणच्या अभय व स्मार्ट सोलर योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
जनजागृती व नोंदणी शिबिरात १२ ग्राहकांचा अभय योजनेला प्रतिसाद; ८ ग्राहकांची स्मार्ट सोलरसाठी नोंदणी
जळगाव खुर्द, दि. २६ नोव्हेंबर २०२६ (प्रतिनिधी) :
महावितरणच्या अभय योजना २०२६-२७ आणि १ किलोवॅट स्मार्ट सोलर योजनेबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जळगाव खुर्द येथे गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) विशेष माहिती व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील वीजग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात सुमारे ४० ते ५० ग्राहकांनी भेट देऊन दोन्ही योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यापैकी १२ ग्राहकांनी अभय योजनेअंतर्गत थकीत वीजबिल भरण्याची तयारी दर्शविली, तर ८ ग्राहकांनी १ किलोवॅट स्मार्ट सोलर योजनेसाठी नोंदणी केली.
महावितरणच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना योजनांची माहिती मिळण्यासोबतच त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. वीजग्राहकांनी उपलब्ध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, या उद्देशाने अशा जनजागृती उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
हे शिबिर महावितरणच्या नशिराबाद ग्रामीण शाखेच्या वतीने राबविण्यात आले. या उपक्रमाची माहिती कनिष्ठ अभियंता जयेंद्र भगवान सपकाळे यांनी दिली.
