Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मावळ»भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष? सचिन काळभोर यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद तीव्र
मावळ

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष? सचिन काळभोर यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद तीव्र

आमदार महेश लांडगे यांच्याशी मतभेद ठळक; आरोप-प्रत्यारोपांमुळे पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये गटबाजीची चर्चा
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Sachin kalbhor
Sachin kalbhor
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत संघर्ष चिघळल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षाच्या वाट्याला आलेल्या सात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, त्यामध्ये भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

सचिन काळभोर यांनी शहरातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः निगडी चौकातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण विरोधी कारवाई तसेच विविध नागरी समस्यांवर त्यांनी थेट आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. यामुळेच त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

भोसरी विधानसभा निवडणुकीदरम्यानही काळभोर यांनी आमदार लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे पत्रव्यवहार केल्याचेही समोर आले होते. तसेच काही राजकीय कार्यक्रमांमध्ये ‘दारू-मटण संस्कृती’ला विरोध दर्शवून त्यांनी पक्षातील काही पद्धतींवर टीका केली होती.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौथरा बांधकाम प्रकरणात सुमारे पाच कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप करत काळभोर यांनी महापालिका प्रशासनासह आमदार लांडगे यांच्यावर टीका केली होती. या मुद्द्यावरून दोघांमधील राजकीय दरी आणखी वाढल्याचे बोलले जाते.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी काळभोर इच्छुक असून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या नावाला आमदार लांडगे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपमध्ये गटबाजी उघड झाल्याचे चित्र दिसत आहे.

याशिवाय, चिखली येथील टाऊन हॉल उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या काळभोर यांना आमदार लांडगे यांनी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात काळभोर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, गेल्या महिन्यात सचिन काळभोर यांनी ‘मातोश्री’ येथे भेट दिल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याबाबत प्रतिक्रिया देताना काळभोर यांनी या सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले. “मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असून माझ्याविरोधात राजकीय हेतूने चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत,” असे त्यांनी सांगितले. एकाच पक्षातील दोन नेत्यांमधील उघड मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी काळात स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर या वादाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपरदेशी शिक्षणासाठी अनु.जाती – नवबौद्ध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करण्याची सुवर्णसंधी
Next Article उत्तर प्रदेशात ‘आंबेडकर मूर्ती विकास योजना’ जाहीर; ४०३ कोटींचा निधी आणि भव्य उत्सवाची तयारी
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

मिशन बंगाल: अमित शाह यांचा १५ दिवसांचा ‘तंबू’ आणि १७० पारचे लक्ष्य!

April 8, 2026

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

April 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?