Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»जळगाव»वाटाघाटींमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे सेनेला?
जळगाव

वाटाघाटींमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे सेनेला?

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Negotiations, Jalgaon, Legislative Council, Seat, Shinde
Negotiations, Jalgaon, Legislative Council, Seat, Shinde
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या नावामुळे बदलते समीकरण; भाजपसमोर नवे आव्हान, महायुतीत तणाव शिगेला

उमेदवारीवरून भाजप-शिंदे सेनेत रस्सीखेच; ‘मैत्रीपूर्ण’ लढतीची शक्यता, खर्चिक निवडणुकीने इच्छुक सावध

 जळगाव | मुकुंदराव नंन्नवरे : जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी महायुतीत चुरस वाढत असून, चालू वाटाघाटींमध्ये ही जागा शिंदे सेनेला जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. भाजप आणि शिंदे सेनेने या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, परभणी आणि नाशिकमधील जागांच्या वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर जळगावची जागा शिंदे गटाला देण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घेतला जात आहे. परभणी मतदारसंघात भाजपचे वर्चस्व वाढल्याचे दिसत असताना, नाशिकमध्ये शहरी भागात भाजप तर ग्रामीण भागात शिंदे गटाची ताकद दिसून येते. या संतुलनाच्या राजकारणात जळगावची जागा शिंदे सेनेला मिळण्याची शक्यता बळावली आहे. जळगाव मतदारसंघात जवळपास १००० मते असून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये ३० ते ३५ मतांचे अंतर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अंतिम वाटाघाटीत परभणी भाजपला आणि जळगाव शिंदे गटाला असा फॉर्म्युला निश्चित होण्याची चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर आले आहे. मंत्री पाटील यांचे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी असलेले निकट संबंध आणि जिल्ह्यातील मजबूत जनसंपर्क यामुळे प्रताप पाटील यांच्या उमेदवारीला बळ मिळत असल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, प्रताप पाटील यांचे नाव पुढे आल्याने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महायुतीत एकमताने उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास ‘मैत्रीपूर्ण’ लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही वर्षांत जळगावमध्ये शिंदे सेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. संघटनात्मक मजबुती आणि जनसंपर्कामुळे पक्ष आक्रमक भूमिकेत आहे. कार्यकर्त्यांकडून प्रताप पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्यांशी असलेली जवळीक यामुळे त्यांची प्रतिमा बळकट झाली आहे.

दुसरीकडे भाजपकडून उद्योजक नंदकुमार अडवाणी, माजी जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन आणि अमोल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. जिल्ह्यातील मजबूत संघटना आणि मतदारसंघातील प्रभाव पाहता भाजपही ही जागा सहज सोडण्याच्या मनःस्थितीत नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मतदारांची भूमिका या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरू शकते, अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीने अद्याप सावध भूमिका घेतली असून योग्य वेळी रणनीती जाहीर केली जाईल.

💰 महागडी निवडणूक; इच्छुकांमध्ये संभ्रम
विधान परिषदेची निवडणूक पारंपरिकरीत्या खर्चिक मानली जाते. २०१० मधील निवडणूक विशेष चर्चेत होती. यावेळीही थेट लढत झाल्यास खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुक पुढे येण्यास उत्सुक असले तरी आर्थिक गणितामुळे सावध भूमिका घेत आहेत. जर भाजप आणि शिंदे सेनेमध्ये अंतिम युती फॉर्म्युला निश्चित झाला, तर महायुतीसाठी निवडणूक सोपी होऊ शकते. त्यामुळे अंतिम निर्णयानंतरच इच्छुकांची संख्या आणि राजकीय समीकरणे स्पष्ट होतील, असे जाणकारांचे मत आहे. एकूणच, जळगाव विधान परिषदेची ही निवडणूक महायुतीतील अंतर्गत राजकारण, संभाव्य ‘मैत्रीपूर्ण’ लढत आणि इतर पक्षांच्या भूमिकेमुळे अत्यंत रंगतदार ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Jalgaon Legislative Council Seat Shinde जळगाव जागा परिषद वाटाघाटी विधान शिंदेNegotiations
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना ‘महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण’ पुरस्कार
Next Article ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी ‘भारत बंद’ला प्रतिसाद
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

April 24, 2026

जळगावात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई : १०० कर्कश सायलेन्सर आणि २५० फॅन्सी नंबर प्लेट्स नष्ट

April 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

By Jansamrattimes@gmail.comApril 24, 20260
Spread the love

मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा कल्याण  : कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण…

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026

बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

April 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?