भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक पुणे जिल्हातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव
पुणे (शंकर जोग) : पुण्यनगरीचे माजी महापौर तथा नगरसेवक प्रशांत दादा जगताप यांची काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक पुणे जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
वानवडी, पुणे येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात इंटकचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. धनंजय बुद्धिवंत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रशांत दादा जगताप यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी काँग्रेस इंटकच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णा माने, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष अलिशा बुद्धिवंत, काँग्रेस इंटकचे पुणे शहराध्यक्ष इमरान शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात प्रशांत दादा जगताप यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
