उल्हासनगर महानगर पालिकेचे दुर्लक्ष
ठाणे । प्रशांत ल. ढोणे
उल्हासनगर महानगर पालिका कॅम्प न.४ येथील मुक्तिबोध स्मशानभूमिची अवस्था खराब झाली असून त्याठिकाणी मयत घेऊन जाव की नाही अशी अवस्था झाली असून त्याची विल्हेवाट लावण्यात कमालीची अडचण निर्माण होत आहे
कारण त्या ठिकाणी मयत जाळंण्यासाठी असलेल्या पत्र्याचे शेड पूर्णपणे मोडकळीस आले असून त्याकडे महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन तेथे त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी होत असल्याचे दिसून आले मयत जळत असताना वरुण पावसाच्या धारा पडतात
त्यामुळे मयताची विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचारी यांना पावसाच्या वेळी मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे तरी याची जाणीव महानगर पालिका आयुक्त,महापौर आणि इतर पदाधिकारी यांना देण्यात येणार असून त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे शिवसेना वरिष्ट कार्यकर्ते आणि त्या विभागातील जागरूक राजेश माने साहेब यांनी मिडियाशी बोलताना सांगितले
