इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी; आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकीसह १० वी-१२ वी उत्तीर्णांनाही अर्जाची संधी
जळगाव | प्रतिनिधी
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी २०७ हून अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जैन इरिगेशन प्रा. लि., स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स प्रा. लि., छबी इलेक्ट्रिकल्स प्रा. लि., रेमंड प्रा. लि., लिग्रण्ड प्रा. लि., अॅस्टीमो प्रा. लि., एडीको प्रा. लि. (पुणे) तसेच आकाशवाणी, जळगाव यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
सदर पदांसाठी आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, बी.ई., बी.टेक., बी.एस्सी., पदवीधर, इंजिनिअरिंग असिस्टंट तसेच इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी महास्वयंम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून संबंधित पदांसाठी अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी थेट रोजगार मेळाव्यात उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.
