चोरगाव जि.प. शाळेतील १२५ विद्यार्थ्यांना शासकीय गणवेश व जीपीएस ग्रुपकडून वह्यांचे वाटप
पाळधी / जळगाव | प्रतिनिधी (दि. १३ जुलै २०२६)
जिल्हा परिषद शाळा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भक्कम पाया असून, या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश संपादन करत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश देऊन शाळांची पटसंख्या वाढवावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
चोरगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १२५ विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच जीपीएस ग्रुपच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सर्व १२५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रगती साधावी. जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक भूषण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक रमेश बोरसे यांनी केले, तर मुख्याध्यापक प्रकाश बडगुजर यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच नाना सोनवणे, उपसरपंच प्रवीण पवार, ग्रामपंचायत सदस्य जगन सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली सोनवणे, उपाध्यक्ष प्रवीण सोनवणे, शिक्षक दारासिंग राठोड, जयवंतराव पाटील, सुनंदा कोळी यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
