संघटनात्मक बांधणी, आगामी कार्ययोजना आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर होणार चर्चा
जळगाव | प्रतिनिधी
समता सैनिक दल जळगाव जिल्हा मध्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत जिल्हा मध्य विभागाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा, आगामी कार्ययोजना तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
याशिवाय संघटनेच्या बळकटीसाठी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समता सैनिक दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
बैठकीस जळगाव जिल्हा मध्य विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सैनिकांनी वेळेचे काटेकोर पालन करून सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क : ९९२१३२३२८१ / ७२४९०२४१४१
