तालुका विधी सेवा समिती, रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व माऊली ज्येष्ठ नागरिक संस्थेचा संयुक्त उपक्रम; १४० ज्येष्ठ नागरिकांना विधी विषयक मार्गदर्शन
भुवनेश्वर दुसाने पाचोरा | प्रतिनिधी
दिवाणी व फौजदारी न्यायालय, पाचोरा अंतर्गत कार्यरत असलेल्या तालुका विधी सेवा समिती, रोटरी क्लब पाचोरा-भडगाव आणि माऊली ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवा शिबिर उत्साहात संपन्न झाले.
१७ जुलै ‘आंतरराष्ट्रीय न्याय दिन’ निमित्त शहरातील माऊली ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या ‘विरंगुळा’ सभामंडपात ज्येष्ठ नागरिकांसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम नागो सोनार होते.
बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रशांत मालखेडे आणि रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. मुकेश तेली, डॉ. अजय परदेशी, डॉ. अनिल देशमुख, चंद्रकांत लोढाया, के. एस. महाजन, डॉ. भरतकुमार प्रजापत, डॉ. प्रशांत विसपुते, डॉ. नंदकिशोर पिंगळे, अजहर खान, प्रकाश विसपुते आणि ॲड. मंगेश सांगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, वैयक्तिक वाद निवारण पद्धती, मानसिक आजार व मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्तींसाठी उपलब्ध विविध योजना, आदिवासी हक्क संरक्षण आणि कार्यवाही तसेच वैकल्पिक वाद निवारण पद्धती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश विसपुते यांनी केले, तर के. एस. महाजन यांनी आभार मानले. या शिबिराला सुमारे १४० ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
