राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अशोक खनाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार सहामाही बैठक; संघटन विस्तार व देशहिताच्या विषयांवर होणार चर्चा
चाळीसगाव (जि. जळगाव) | प्रतिनिधी
समता सैनिक दलाचे संस्थापक विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यरत असलेल्या समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीची नियमित सहामाही बैठक रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव (जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अशोक खनाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय महासचिव कॅप्टन डॉ. गुलाबराव राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
बैठकीमध्ये देशहिताशी संबंधित विविध विषयांसह समता सैनिक दलाच्या वाटचालीचा आढावा, संघटनात्मक विस्तार आणि आगामी कार्ययोजनांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरात समता सैनिक दलाचे निष्ठावान सैनिक तयार व्हावेत तसेच सर्व राज्यांमध्ये जिल्हा व तालुका शाखांची उभारणी व्हावी, यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार समता सैनिक दलाचे कार्य करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीस उपस्थित राहण्यासाठी इच्छुकांनी आगाऊ ९९२१३२३२८१ किंवा ७०२०५५८०११ या क्रमांकावर संपर्क साधून अथवा
व्हॉट्सअॅपद्वारे उपस्थितीची माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल आणि महाराष्ट्र राज्य महासचिव शशिकांत थूल यांनी केले आहे.
