गरजू वृद्ध महिलेसाठी नितीन तायडे यांचे तातडीने रक्तदान
ओम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रक्तदान करून जपला मानवतेचा धर्म; रक्तदानाची ११ वी वेळ
भुवनेश्वर दुसाने पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा येथील ओम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सामनेर येथील एका वृद्ध महिलेला तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली असता सामाजिक बांधिलकी जपत नितीन (दादा) तायडे यांनी तत्काळ रक्तदान करून मोलाची मदत केली.
समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असलेले आणि मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू आरोग्य सेवक म्हणून ओळख असलेले नितीन तायडे यांनी कोणताही विलंब न करता रक्तदानासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत ११ वेळा रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.
त्यांच्या या तत्परतेमुळे गरजू वृद्ध महिलेला वेळेत रक्त उपलब्ध झाले. त्यांच्या या मानवतावादी कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केला आहे.
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, पाचोरा तालुक्याच्या वतीने नितीन तायडे यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या समाजसेवेचा अभिमान व्यक्त करण्यात आला.
