भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
भव्य रक्तदान शिबिराचे बक्षीपूर येथे उत्साहात आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत समाजोपयोगी उपक्रमास प्रतिसाद
वीरप्पन रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात व समाजहिताच्या भावनेतून संपन्न झाले. या कार्यक्रमाला रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. अमोल भाऊ जावळे, विधानपरिषदेचे नवनियुक्त आमदार श्री. नंदकिशोर महाजन, श्री. अरुण दादा पाटील, श्रीमती केतकीताई पाटील, श्री. सुरेश धनके, श्री. पद्माकर महाजन, श्री. अरुण शिंदे, श्री. संदीप सावळे, श्री. प्रल्हाद पाटील, गोमतीताई बारेला, श्री. भास्कर महाजन, श्री. राजन लासूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत समाजोपयोगी कार्यात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.
