खान्देशच्या सुपुत्राचा मराठवाड्यात गौरव; डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026
आरोग्यसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान
चोपडा | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील **‘वामन अॅक्युपंक्चर अॅण्ड नॅचरोपॅथी केंद्र’**चे संचालक डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना आरोग्यसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिनांक १९ जुलै २०२६ रोजी आयोजित भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) आणि AGMA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात अॅक्युपंक्चर व निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपचारकांचा सन्मान करण्यात आला. आयुर्वेद, योग, सिद्ध, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर आणि निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धतींच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणाऱ्या या संस्थांनी डॉ. सैंदाणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांनी जळगाव जिल्ह्यात हजारो रुग्णांना अॅक्युपंक्चर आणि निसर्गोपचाराद्वारे उपचार देत आरोग्यसेवा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सेवाकार्याची दखल घेत त्यांचा प्रतिष्ठेच्या ‘महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार २०२६’ ने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेते डॉ. सुयोग गोरेंद्र, अॅड. नाझिर काझी (प्रदेश अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), अॅड. दत्तात्रय जाधवर आणि अॅड. नागेश सोनुने उपस्थित होते.
यावेळी डॉ. सतीश कराळे (चेअरमन), डॉ. नितीनराजे पाटील (व्हाईस चेअरमन), डॉ. बाबुराव कानडे (राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. अभिजीत कवठकर, डॉ. प्रशांत सावंत, डॉ. दिशा चव्हाण, डॉ. स्मिता खारकर, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. सारंग फुके, डॉ. श्रीधर मेश्राम, डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. तुषार वाघुळदे, डॉ. विजय पाटील यांच्यासह AIMA आणि AGMA चे पदाधिकारी तसेच अनेक वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.
