धरणगाव येथे कुंभार समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर; संत गोरोबाकाका जयंतीनिमित्त भक्तिमय कार्यक्रम
विठ्ठल-रुक्मिणीची महाआरती, फराळ वाटप आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांचा गौरव
भवरखेडे | प्रतिनिधी
धरणगाव येथील किरण टॉकीज परिसरात संत गोरोबाकाका जयंती आणि आषाढी पर्वाच्या निमित्ताने कुंभार समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीची आरती, फराळ वाटप आणि मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
संत गोरोबाकाका मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून नवरात्रोत्सवासह विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच कुंभार समाजाची स्वतंत्र कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेविका ज्योती लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. यावेळी सर्व मान्यवरांसह मंडळाला सातत्याने सहकार्य करणारे अरविंद चौधरी, राज चौधरी, मनोज चौधरी आणि पत्रकार अविनाश बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कुंभार समाजासाठी मोलाचे योगदान देणारे रविंद्र पाटील यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना नगरसेवक सुनील चौधरी यांनी कुंभार समाजाच्या सामाजिक आणि उपक्रमशील कार्याचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी डीजे आणि भडक देखाव्याऐवजी परंपरा जपत उत्सव साजरा केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन केले तसेच कायद्याचे पालन करण्याचे महत्त्वही सांगितले. नगराध्यक्षा लिलाताई चौधरी यांनी संत गोरोबाकाका यांच्या कार्याचा गौरव करत समाजाने एकजुटीने कार्य करून नवीन पिढीपर्यंत समृद्ध परंपरा पोहोचवावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी भक्तिमय वातावरणात विठ्ठल-रुक्मिणीची महाआरती करण्यात आली आणि उपस्थितांना फराळाचे वाटप करण्यात आले.
समस्त कुंभार समाज पंच मंडळ – नूतन कार्यकारिणी
-
अध्यक्ष: मारुती सुरेश कुंभार
-
उपाध्यक्ष: बापू जुलाल कुंभार
-
सचिव: आकाश भिका कुंभार
-
सदस्य: गोरख लोटन कुंभार
-
सदस्य: मोहन शहादू कुंभार
-
सदस्य: बाळू संतोष कुंभार
-
सदस्य: पिंटू भादू कुंभार
-
सदस्य: राहुल संतोष कुंभार
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संत गोरोबाकाका मित्र मंडळ तसेच कुंभार समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.
