चोपडा तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बैठक संपन्न; शताब्दी वर्ष कार्यक्रम व संघटन विस्तारावर भर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शताब्दी वर्षानिमित्त उपक्रम, पदाधिकारी नियुक्ती व बीएलए नियुक्तीबाबत मार्गदर्शन
चोपडा | प्रतिनिधी
आज चोपडा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तालुका बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, संघटन विस्तार, पदाधिकारी नियुक्ती तसेच बीएलए (Booth Level Agent) नियुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीला शिवसेना उपनेते तथा नंदुरबार जिल्हा व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, शहरप्रमुख शशिकांत कन्हैये यांच्यासह ग्रामीण व शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आगामी संघटनात्मक कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, बूथस्तरावरील संघटन अधिक मजबूत करणे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत आगामी राजकीय आणि संघटनात्मक उपक्रमांच्या यशस्वी नियोजनावर चर्चा करण्यात आली तसेच पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
