रावेर येथे ११ ऑगस्टला भव्य रोजगार मेळावा; तरुण-तरुणींना थेट नोकरीची संधी
पुणे-जळगाव परिसरातील नामांकित कंपन्यांचा सहभाग; सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजन
रावेर | विशेष प्रतिनिधी : प्रदीप खैरे
रावेर व परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे आणि जळगाव परिसरातील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी होऊन उमेदवारांची थेट भरती प्रक्रिया राबविणार आहेत.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन डॉ. केतकी पाटील फाउंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.
जिमखाना हॉलमध्ये मेळावा
रोजगार मेळावा मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर येथील जिमखाना हॉलमध्ये होणार आहे.
अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग
मेळाव्यात पुणे व जळगाव परिसरातील विविध कंपन्या सहभागी होणार असून, त्यामध्ये ड गिअर प्रा. लि., पुणे, क्वेच कॉर्प लि., पुणे (टाटा मोटर्स, पुणे), लिग्रँड प्रा. लि., जळगाव, अस्तीमो प्रा. लि., बांभोरी, सुप्रीम इंडस्ट्रीज, जळगाव, पद्मजा फार्मा प्रोड्यूसर कंपनी, चोपडा आणि रेमंड प्रा. लि., जळगाव यांचा समावेश आहे.
उमेदवारांनी कागदपत्रे सोबत आणावीत
मेळाव्यात सहभागी होणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा (Resume), आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणणे आवश्यक आहे.
रावेर व परिसरातील पात्र आणि इच्छुक तरुण-तरुणींनी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
