आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशनमध्ये विविध साहित्याचे वाटप
मनोरुग्णांना मिष्टान्न, पुरुषांना टी-शर्ट तर महिलांना कपड्यांचे वाटप
बोदवड प्रतिनिधी : मुक्ताई विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशनमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता, आत्मसन्मान फाउंडेशन, मुक्ताई मंगल कार्यालयाच्या मागे, बोदवड येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनोरुग्णांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात येणार असून, पुरुषांना टी-शर्ट तर महिलांना कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

विनीत : राजेश नानवाणी
नगरसेवक, नगरपंचायत बोदवड
उपाध्यक्ष, व्यापारी संघटना, बोदवड
शिवसेना शहर संघटक, बोदवड




