जेष्ठ नागरिक दिवसानिमित्त विधी सेवा शिबीर
एरंडोल प्रतिनिधी :-
जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन म्हणून ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, समाजातील ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान करण्यात येतो.
एरंडोल येथे तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्यावतीने जेष्ठ नागरिक दिवसानिमित्त जेष्ठ नागरिक सभागृह दत्त कॉलनी येथे विधी सेवा शिबीर राबविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून एरंडोल न्यायालयाचे न्यायाधीश श्री एच.एस. कोरहाळे, शिबीराचे अध्यक्ष बि. डी. ओ निकम, अग्रवाल, गुरव, भालेराव सर तसेच एरंडोल येथील रिटेनर अँड. मधुकर बी. देशमुख, अँड. प्रतीभा पाटील, अँड. जयेश पिलोरे, पंढरीनाथ मोरे, हर्षदा पाटील, अँड. जे. जी. पाटील या सर्वांनी जेष्ठ नागरिक कायदेशीर हक्क व अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण माळी सर व सर्व पधादिकारी तसेच सदस्यांचा सहभाग होता. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्थाविक अँड. मधुकर बी. देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संखेने जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
