स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आक्रमक रणनीती; “जिंका, अन्यथा पर्याय नाही” — नेतृत्वाचा स्पष्ट इशारा
मुंबई (प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सत्तेवर झेप घेण्यासाठी आक्रमक ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर केली आहे. राज्यातील २२ जिल्हा परिषद व २२५ पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळवण्याच्या उद्देशाने पक्षाने १२ प्रमुख मंत्र्यांच्या खांद्यावर २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नंदनवन’ या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाने यावेळी “जिंका, अन्यथा पर्याय नाही” असा स्पष्ट संदेश मंत्र्यांना देत निवडणूक तयारीत कोणतीही ढिलाई नको, असे निर्देश दिले आहेत. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेने यावेळी राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक संपर्क मंत्र्याला दोन जिल्ह्यांची जबाबदारी देत निवडणूक व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ‘पॉवर ब्लूप्रिंट’मुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची रणनीती अधिक आक्रमक आणि संघटित पद्धतीने राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🗂️ जिल्हानिहाय मंत्र्यांची जबाबदारी:
-
गुलाबराव पाटील : जळगाव व नंदुरबार
-
उदय सामंत : नाशिक व अहमदनगर
-
योगेश कदम : ठाणे व पालघर
-
प्रकाश आबिटकर : नांदेड व हिंगोली
-
भरतशेठ गोगावले : बीड
-
आशिष जयस्वाल : जालना
-
प्रताप सरनाईक : अमरावती व अकोला
-
संजय राठोड : यवतमाळ व वाशिम
-
संजय शिरसाट : भंडारा व गोंदिया
-
प्रतापराव जाधव : नागपूर व वर्धा
-
शंभुराज देसाई : गडचिरोली व चंद्रपूर
-
दादा भुसे : धुळे व बुलढाणा
