छायेश्वरी निकम प्रथम; विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाने विद्यालयाची परंपरा कायम
एरंडोल : करण शिंदे
एरंडोल येथील रा.ति. काबरे विद्यालय चा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ८१.१० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेतील एकूण २५४ विद्यार्थ्यांपैकी २०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये छायेश्वरी झगडू निकम हिने ९२.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी ज्ञानेश्वर पाटील हिने ९१.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर पूर्वी हेमंत धामणे हिने ९० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांचे अभिनंदन
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरे, सचिव राजूभाऊ मणियार, सहसचिव धिरजभाऊ काबरे, शाळेचे चेअरमन अनिलभाऊ बिर्ला तसेच संस्थेचे सदस्य सतीशभाऊ परदेशी आणि परेश बिर्ला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले यशाची गुरुकिल्ली
शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके, पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यालयाच्या उल्लेखनीय निकालामुळे पालक आणि परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
