जैन समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा; युवा नेतृत्वाचे संजय दराडे यांच्याकडून कौतुक
पुणे (शंकर जोग) : राष्ट्रीय जैन सेना युवा संघटनेच्या वतीने पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित या भेटीप्रसंगी जैन समाजाच्या कल्याण, प्रगती आणि सामाजिक हिताशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय जैन सेना युवा संघटनेचे अध्यक्ष ओम प्रवीण ओसवाल यांनी सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेऊन विविध सामाजिक विषयांवर संवाद साधला. समाजहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाशी समन्वय राखण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.
चर्चेदरम्यान सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी जैन सेना युवा संघटनेच्या कार्याचा आढावा घेत युवा अध्यक्ष ओम प्रवीण ओसवाल यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजातील युवकांनी विधायक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जैन सेना युवा संघटनेचे कार्यकर्ते प्रणव जैन, कार्तिक ठक्कर, कविश मेहता, विनायक जैन, मन जैन यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
