शेख एहतेशाम इम्तियाज प्रथम; राज्यातील ३० वक्त्यांचा सहभाग; १० जून रोजी नाशिक येथे होणार पुढील फेरी
धुळे (सुनील निकम) : युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘सडेतोड’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडली. राज्यभरातून आलेल्या ३० कसलेल्या वक्त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण व सडेतोड मते मांडत उपस्थितांची मने जिंकली. चुरशीच्या या स्पर्धेत शेख एहतेशाम इम्तियाज यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुनीलभाऊ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख न्हानूभाऊ परदेशी, निंबा नाना मराठे आणि महिला आघाडी संघटिका जयश्रीताई वानखेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन आणि संयोजन युवासेना धुळे जिल्हा युवाधिकारी कुणाल कानकाटे यांनी केले.
स्पर्धेतील प्रत्येक सहभागीने प्रभावी वक्तृत्वशैली आणि विषयावरील सखोल अभ्यासाच्या जोरावर आपली छाप पाडली. त्यामुळे परीक्षकांसमोर विजेत्यांची निवड करणे आव्हानात्मक ठरले. ज्येष्ठ पत्रकार सुनीलभाऊ पाटील, जयश्रीताई वानखेडे आणि निंबा नाना मराठे यांनी परीक्षक म्हणून निष्पक्ष व काटेकोर मूल्यमापन करत अंतिम निकाल जाहीर केला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला –
प्रथम क्रमांक : शेख एहतेशाम इम्तियाज
द्वितीय क्रमांक : सागर मनोहर निकम
तृतीय क्रमांक : अविनाश संजय जोंधळे
जिल्हास्तरीय फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांची निवड पुढील राज्यस्तरीय मुख्य फेरीसाठी करण्यात आली असून, ही स्पर्धा १० जून रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे विजेत्यांमध्ये नव्या फेरीसाठी उत्साहाचे वातावरण आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कापली लिंगायत, अण्णा फुलपगारे, जयेश नाईक, ओम कानकाटे, हर्षल मेंढे, ओम पाकळे, सनी गायकवाड, दादू गवळी, कृष्णा माळी, भावेश शार्दुल, श्री बागुल, पियुष शिरसाठ, दक्ष पाटील, तुषार पाटील, सोमेश कानकाटे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या माध्यमातून युवा वक्त्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून, धुळे जिल्ह्यातील या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
