सामाजिक एकता जपण्याचे आवाहन
धुळे : धुळे येथे दिनांक ५ जून २०२५ रोजी आदिवासी समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या मेळाव्यात विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापली मते मांडत समाजातील शिक्षण, संघटनात्मक बळकटी, सामाजिक प्रगती आणि एकी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी समाजातील युवकांनी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची गरज अधोरेखित केली.
या मेळाव्यात मा. भवरलाल दादा परमार आणि सतीश दादा पेदाम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाने आपल्या रुढी-परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपत समाजातील एकता अधिक दृढ करण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच येणाऱ्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सामाजिक चळवळींमध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी टायगर सेना यांच्या वतीने मा. भवरलाल दादा परमार, सतीश दादा पेदाम तसेच मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या आयोजकांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी समाजहितासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
