३० जून ते २९ जुलैदरम्यान सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा; १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन
संदीप पाटील पारोळा | प्रतिनिधी
पारोळा शहरात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक पारोळा नगरपरिषदेच्या सभागृहात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील, शहर तलाठी निशिकांत माने, प्रशासकीय अधिकारी यामिनी लक्ष्मणसा जटे, माजी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिष पाटील, नगरसेवक अमोल शिरोळे, भावडू राजपूत, भूषण टिपरे, धीरज महाजन, विनोद पाटील, विवेक पाटील, इम्रान शेख सलीम, नजीर खान बेलदार, दगडू पवार, सौ. मंगला चौधरी, कार्यालय अधीक्षक अनिल तिदमे, वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर रिजल तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किरण विसावे, निर्मल दूधवे, रवींद्र ठाकरे, विशाल गायकवाड आणि सचिन चौधरी उपस्थित होते.
बैठकीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदार यादीतील नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच आवश्यक दुरुस्त्या वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत पाटील यांनीही शहरातील नागरिक आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात जनजागृती करून या राष्ट्रीय कार्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत जनजागृती वाढविणे, पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि विहित कालावधीत पुनरिक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
