राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव अधीक्षकपदी प्रदीप पोटे यांची नियुक्ती
डॉ. व्ही. टी. भूकन यांची नाशिक येथे बदली; प्रदीप पोटे यांनी स्वीकारला पदभार
जळगाव | प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव येथील अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांची नाशिक येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी प्रदीप पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली येथे अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप पोटे यांची बदली जळगाव येथे करण्यात आली असून त्यांनी नुकताच अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
दरम्यान, डॉ. व्ही. टी. भूकन यांनी जळगाव येथे अधीक्षक म्हणून कार्य केल्यानंतर त्यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. नव्या नियुक्तीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
