रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या दोन शाखांचे उद्घाटन
पुण्यातील डायमंड हॉटेल व विर्वाणी प्लाझा येथे सोहळा; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
पुणे | प्रतिनिधी (शंकर जोग)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहरातील दोन नव्या शाखांचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे कॅम्प येथील डायमंड हॉटेल आणि विर्वाणी प्लाझा येथे आयोजित कार्यक्रमात या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्ष संघटन बळकट करण्याबरोबरच समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटक सचिव तथा पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, पुणे शहर उपाध्यक्ष येसू दोरास्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याला पुणे शहर व जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
