श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जळगाव ग्रामीण संघटकपदी सुनील बाबूराव राजपूत यांची नियुक्ती
वरिष्ठ नेतृत्वाचे मानले आभार; ‘माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही तुटू देणार नाही’
जळगाव : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जळगाव ग्रामीण संघटकपदी सुनील बाबूराव राजपूत यांची नुकतीच अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर सुनील राजपूत यांनी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
अमरशहीद ठा. सुखदेवसिंहजी गोगामेडी यांच्या प्रेरणा व विचारांनी कार्यरत असलेल्या संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल सुनील राजपूत यांनी आनंद व्यक्त केला. नियुक्तीबद्दल त्यांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अॅड. शिला सुखदेवसिंहजी गोगामेडी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविणसिंहजी दादा पाटील, प्रदेश संघटक विलास नाना पाटील आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर भाऊ राजपूत यांचे विशेष आभार मानले.
तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग भाऊ मोरे व जिल्हा कार्यकारिणीचेही त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना सुनील राजपूत म्हणाले, “या मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करेन. वरिष्ठ नेत्यांनी आणि सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही तुटू देणार नाही.”
या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात संघटनेचे कार्य अधिक व्यापक होण्यास तसेच संघटनात्मक बांधणीला बळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
