Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»पुणे»आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना, अजून एका बाबाचे मोठे कांड!
पुणे

आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना, अजून एका बाबाचे मोठे कांड!

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Ashram, Fake Notes, Factory, Scandal Involving a 'Baba'
Ashram, Fake Notes, Factory, Scandal Involving a 'Baba'
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

नाशिक : नाशिकमधील ज्योतिषी आणि भोंदूगिरी करणारा अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर गुजरातमध्ये एका बाबाने अजून एक कांड केले आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरत येथे नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आश्रमातून 2 कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्या आहेत. सुरत जवळील कामरेज तालुका आहे. येथील पारडी गावात ‘श्री सत्य योग फाउंडेशन’ या आश्रमात हे असत्याचे प्रयोग सुरू होते. बाहेरून धर्माचे पांघरूण घेऊन आत नकली नोटांचा गोरखधंदा सुरू होता. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे पाप या आश्रमातून सुरू होते.

40 हजारांहून अधिक नकली नोटा जप्त

गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, सुरत येथून नकली नोटांची एक मोठी खेप अहमदाबाद येथे आणण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी गुप्त माहिती आधारे अमराईवाडी परिसरात नाकाबंदी केली होती. तिथे काही महिला आणि 6 पुरुषांच्या संशयास्पद हालचालींनी पोलीस सतर्क झाले. त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 40 हजारांहून अधिक नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. या नोटांची एकूण किंमत जवळपास 2 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.

500 रुपये द्या आणि तीनपट अधिक नोटा मिळवा

या नोटा सुरत येथील वराछा या परिसरात छापल्याचे समोर आले. या नोटा बाजारात चालवण्यासाठी खास योजना आखण्यात आली होती. त्यानुसार खरी 500 रुपयांची नोट द्या आणि 1500 रुपयांच्या नकली नोटा मिळवा अशी स्कीम होती. या भामट्यांनी 66 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 2 कोटी रुपयांच्या खोट्या नोटा बाजारात आणण्याची योजना आखली होती. पण त्यापूर्वीच त्यांचा भांडाफोड झाला.

आश्रमात नोटांचा छापखाना

पोलिसांनी संबंधित आश्रमात छापा टाकला. तिथे प्रिंटिंग मशीन, संगणक, खास कागद, रंग आणि काही महत्त्वाची कागदपत्रं त्यांच्या हाती लागली. आश्रमातील वाहनांचा वापरही या नकली नोटांच्या रॅकेटसाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पंचनामा दरम्यान पोलिसांनी 40 हजारांहून अधिक नकली नोटा जप्त केल्या. या नकली नोटांचे रॅकेटचे देशभरात कनेक्शन असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआयकर नियम 2026 हे 1 एप्रिलपासून नव्याने अधिसूचित
Next Article भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अत्यंत मोठा इशारा
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

गणेश ठेंगळ यांची राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत झळाळती कामगिरी; कांस्य पदकाची कमाई

March 25, 2026

सचिन काळभोरांची मातोश्रीवर भेट; पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ

March 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?