आझाद समाज पार्टीची महाराष्ट्र राज्यस्तरीय समीक्षा बैठक कर्जत येथे संपन्न
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांनी सादर केला सविस्तर अहवाल; प्रदेश कमिटीकडून कार्याचे कौतुक
कर्जत / सोयगाव, प्रतिनिधी – शिवराम जाधव : आझाद समाज पार्टी (काशीराम) ची महाराष्ट्र राज्यस्तरीय समीक्षा बैठक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत, जिल्हा रायगड येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध संघटनात्मक, सामाजिक आणि राजकीय उपक्रमांचा सविस्तर आढावा जिल्हाध्यक्ष विजय देवराव शिनगारे यांनी सादर केला.
जिल्ह्यात संघटन बांधणीसह विविध उपक्रम
१२ मार्च २०२६ रोजी दिल्ली येथे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये पक्ष संघटनेची बांधणी, नवीन कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश, संघटनात्मक बैठका, आंदोलने, शाखांचे उद्घाटन तसेच विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांचा समावेश होता. या सर्व कार्याचा सविस्तर समीक्षा अहवाल जिल्हाध्यक्ष विजय देवराव शिनगारे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष भाई साठे आणि महाराष्ट्र प्रदेश कमिटीसमोर मांडला.
संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची प्रदेश कमिटीने दखल घेत कौतुक केले. तसेच आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, कार्याचा विस्तार करणे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविणे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
प्रदेशातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या राज्यस्तरीय समीक्षा बैठकीस महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत राज्यातील पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन आगामी वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
