ममुराबाद जिल्हा परिषद शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी!
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; भाषणे आणि गीतांतून लोहपुरुषांना अभिवादन
ममुराबाद | प्रतिनिधी
ममुराबाद येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली, तर गीतांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कपिल सोनवणे, उपाध्यक्ष अल्ताफ पटेल, केंद्रप्रमुख प्रणिता पाटील, अशोक कोळी, अनंत कुंभार, अरुण संधयान सर, मुख्याध्यापक किशोर सोनवणे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील सर यांनी केले.
