वडिलांचा वारसा जपणार, जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद
पाळधी (ता. धरणगाव) : पाळधी येथे जिपीएस मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल 810 रुग्णांनी नोंदणी करून नेत्र तपासणीचा लाभ घेतला, तर 330 रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
या शिबिराचे आयोजन मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले होते. शिबिराला गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व उपक्रमाचे कौतुक केले.
गावागावातून नागरिकांची मोठी गर्दी
शिबिरासाठी सकाळी ७ वाजल्यापासूनच परिसरातील विविध गावांमधून आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. नेत्र तपासणीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
330 रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची संधी
तपासणीनंतर 330 रुग्णांना शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
मोफत सेवा; नाश्ता-जेवणाचीही व्यवस्था
शिबिरातील सर्व सेवा पूर्णपणे नि:शुल्क देण्यात आल्या. रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या ‘दृष्टीदान’ उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असून लाभार्थ्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.
वैद्यकीय पथकाचा मोलाचा सहभाग
या शिबिरासाठी डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील शंकरा हॉस्पिटलची टीम, डॉ. विजय ब्राम्हणे, डॉ. गुरप्रीत राठोड, अश्विनी महाले, भूपेंद्र वाघ, प्राजक्ता गायकवाड, डॉ. आकाश इयनोर, सोनाली पंथरे, सागर पाटील यांसह अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी सेवा दिली.
तसेच पाळधी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. ऋषिकेश झंवर, डॉ. सायमा, डॉ. निलोफर, डॉ. रितुल पाटील, आरोग्य सेवक व आशा कार्यकर्त्यांनीही मोठे योगदान दिले.
सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
या शिबिरासाठी डॉ राहुल चौधरी शंकरा हॉस्पिटलची संपूर्ण टीम डॉ विजय ब्राम्हणे,डॉ गुरप्रित राठोड अश्विनी महाले भुपेंद्र वाघ प्राजक्ता गायकवाड डॉआकाश इयनोर प्राजक्ता गायकवाड सोनाली पंथरे सागर पाटील,पाळधी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. ऋषिकेश झंवर डॉ सायमा,डॉ निळोफर डॉ रितुल पाटील डॉ सायमा खान आरोग्य सेवक अतुल नंनवरे अनिल महाजन गतप्रवर्तक संगीता पाटील व सर्व आशा सेविका तसेच जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक शिबिर यशस्वी केले. या सामाजिक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
