🔹 इंटक महासंघाकडून जबाबदारी; कामगारांच्या हक्कांसाठी काम करण्याचा निर्धार
पुणे : भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटकच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी ॲड. धनंजय तुकाराम बुद्धिवंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील कामगार संघटनांना नवे नेतृत्व मिळाले आहे. ही नियुक्ती इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष हौशिल प्रसाद शर्मा यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुभाष माछरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नियुक्ती स्वीकारताना ॲड. धनंजय बुद्धिवंत यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हे इंटकचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच, पुणे जिल्ह्यातील सर्व कामगारांना एकत्रित करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीमुळे स्थानिक कामगार चळवळीला बळ मिळणार असून, विविध क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
