रात्री अज्ञात चोरट्यांचा हातसफाई; नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन
रोटवद (ता. धरणगाव) | प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील रोटवद येथे अज्ञात चोरट्यांनी बजाज पल्सर (१२५ सीसी) मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १९ ईजे १५९१ (MH19 EJ 1591) क्रमांकाची बजाज पल्सर दुचाकी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सकाळी दुचाकी जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याप्रकरणी दुचाकीचे मालक विजय आबाजी शिंदे व मोहन आबाजी शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित दुचाकी कुठेही आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने ९९२१७६११७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
