महाराष्ट्र बंदला सोयगावात उत्स्फूर्त प्रतिसाद; व्यापाऱ्यांनी ठेवली दुकाने बंद
प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद; भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दलासह विविध संघटनांचा सहभाग
सोयगाव | वार्ताहर (शिवराम जाधव)
राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवार, दि. 23 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सोयगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शविला.
या बंदमध्ये भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग घेतला. शांततामय वातावरणात बंद पाळण्यात आला.
बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. व्यापारी बांधवांनी दाखविलेल्या सहकार्याचे स्वागत करत लोकशाही मार्गाने आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
