आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर आमदार अमोल पाटील यांची तातडीची बैठक
विकासकामांसाठी आमदार निधीतून तात्काळ मंजुरीचे आश्वासन; एरंडोलमध्ये लवकरच विशेष बैठकीचे निर्देश
विनोद मोरे कल्याणे होळ प्रतिनिधी
एरंडोल–पारोळा विधानसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी समाजाच्या मूलभूत सुविधा, विकासकामे आणि विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्या परिसरातील विविध समस्या आमदार अमोल पाटील यांच्यासमोर मांडल्या. त्यावर सकारात्मक भूमिका घेत आमदारांनी आवश्यक विकासकामे आमदार स्थानिक विकास निधीतून तात्काळ मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.
तसेच, एरंडोल येथे लवकरच विशेष बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
आदिवासी बांधवांच्या विकासाला प्राधान्य देत त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अमोल पाटील यांनी यावेळी दिली.
