मान्यवरांच्या उपस्थितीत विविध पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांना शालेय किट आणि पत्रकारांना विमा व टी-शर्ट वाटप
पाचोरा – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने उद्या दि. १० ऑक्टोबर रोजी पाचोरा येथे उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, संस्थापक अध्यक्ष तथा संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव वारोटे. राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार अमोल चिमणराव पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, भाजपा युवा नेते अमोलभाऊ शिंदे, भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगावचे गटनेते तथा नगरसेवक लकीचंद पाटील, पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक सुमित पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय किटचे वाटप, पत्रकार बांधवांना विमा पॉलिसीचे वितरण आणि टी-शर्ट वाटप करण्यात येणार आहे तसेच खान्देशी कलाकारांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे. या अधिवेशनाला जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उपाध्यक्ष राकेश सुतार, पाचोरा तालुका अध्यक्ष गौतम सोनवणे आणि भडगाव तालुका अध्यक्ष रतिलाल पाटील यांनी केले आहे
