परवानगीशिवाय वाळू वाहतूक; चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील अनेर नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वढोदा गावालगतच्या अनेर नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. यावेळी दीपक आत्माराम भिल (वय २६, रा. वढोदा, ता. चोपडा) हा कोणतीही परवानगी नसताना ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये सुमारे एक ब्रास वाळू भरून वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४ लाख रुपये किमतीचा स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-२७ एल-५०८८), ट्रॉली आणि अंदाजे ५ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चालक दीपक भिल याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
परवानगीशिवाय वाळू वाहतूक; चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील अनेर नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वढोदा गावालगतच्या अनेर नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. यावेळी दीपक आत्माराम भिल (वय २६, रा. वढोदा, ता. चोपडा) हा कोणतीही परवानगी नसताना ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये सुमारे एक ब्रास वाळू भरून वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४ लाख रुपये किमतीचा स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-२७ एल-५०८८), ट्रॉली आणि अंदाजे ५ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक दीपक भिल याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.