पाळधीत आषाढी एकादशी उत्साहात; भाविकांसह बालदिंडीतील विद्यार्थ्यांना साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप
माजी सभापती संजय पाटील यांच्या पुढाकाराने महाप्रसाद; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी पूजन
पाळधी (ता. धरणगाव) | प्रतिनिधी
देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाळधी येथे धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा पाळधी खुर्दचे माजी सरपंच संजय पाटील यांच्या पुढाकाराने भाविक भक्तांसाठी एक क्विंटल साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले.
येथील शासकीय विश्रामगृहाजवळील दत्त मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित या उपक्रमात दर्शनासाठी आलेले भाविक तसेच विविध शाळांमधून निघालेल्या बालदिंडीतील विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक सुनील झंवर, दिलीप पाटील आणि अनिल कासट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. वारकरी परंपरेत सेवा, समता आणि भक्ती यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात एकोपा जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पवन सोनवणे, माजी सरपंच हेमंत पाटील, बारसु माळी, सागर पाटील, सुभाष कापुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष शरद कासट, विक्रम पाटील, चंदू माळी, डिगू माळी, संदीप पाटील, सचिन महाले, दीपक झंवर, मुन्ना झंवर, राजू क्षीरसागर, चंद्रमणी नन्नवरे, एसपी मित्रपरिवाराचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल सोनवणे यांनी केले.
