नशिराबाद येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
ECG, बीपीसह मुख व स्तन कर्करोग तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, २२० नागरिकांनी घेतला लाभ
नशिराबाद प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. २६ जुलै २०२६) नशिराबाद येथील श्री इच्छापूर्ती हॉलमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जळगाव), समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सुमारे *२२० नागरिकांनी* लाभ घेतला. शिबिरात ईसीजी, बीपी, तसेच मुख व स्तन कर्करोग तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले व मोफत औषधोपचार केला.
प्रमुख उपस्थिती: आमदार अनिल भाईदास पाटील, माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर, डॉ. ए. जी. भंगाळे, सय्यद बरकत अली, योगेश देसले, मुकुंदा रोटे, मन्यार असिफ शेख गनी, मुस्ताक, ठेकेदार नामदेव चौधरी, लीलाधर तायडे, प्रदीप माळी व स्वप्निल जैन.
आयोजन व सहकार्य: शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष *गणेश नथ्थू चव्हाण* यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिरासाठी प्रवीण सुतार, दिलीप मराठे, जयेश पाटील, अभिषेक माळी, रोहन महाजन, शुभम भावसार, महेंद्र मराठे, देविदास काकडे, दिनेश जैन, यश पाटील, पवन मराठे, राजेंद्र चव्हाण, शुभम जैन, ज्ञानेश्वर मराठे, सचिन महाजन, समाधान चव्हाण, दीपक कोळी, किशन साळुंखे, विशाल टापरे, चेतन माळी, अशोक माळी, आकाश टापरे, प्रफुल्ल पाटील, अनिल काळे व मयुर शिवरामे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तुषार रंधे सर यांनी केले.
