समाज संघटन व सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे):
राजपूत समाजाच्या संघटन, सक्षमीकरण आणि समाजहितासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय राजपूत करणी सेना संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी दामोदर राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली असून, भालोद येथील शिक्षक भास्कर नामदेव पाटील यांची खान्देश प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे राजपूत समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही नियुक्ती सनातन रत्न परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला भाभीसा सुखदेवसिंहजी गोगामेडी, राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटन महामंत्री योगेंद्रसिंहजी कट्यार, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराजसिंहजी गोगामेडी, आनंदसिंहजी ठोके आणि महामंत्री सूरजसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील (राजपूत) यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.
दामोदर राजपूत यांनी समाजकार्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावरून कार्यकारी अध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच भास्कर नामदेव पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर खान्देश प्रवक्त्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना दामोदर राजपूत आणि भास्कर (बी. एन.) पाटील यांनी राजपूत समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजाच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणे हेच आपले प्रमुख ध्येय राहील, असा निर्धार व्यक्त केला. तसेच प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी करणी सेनेचे सहप्रवक्ते राजेंद्रसिंह पाटील, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हाध्यक्ष संदीप राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारिका पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिवाणसिंग राजपूत, शहराध्यक्ष गोकुळ राजपूत, जिल्हा सचिव पंकज चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मीना राजपूत, कविता राजपूत, जयश्री राजपूत, प्रतीक्षा पाटील, लता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
