प्रतिमापूजन करून महान साहित्यिकाला अभिवादन; सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना उजाळा
धरणगाव | प्रतिनिधी :
धरणगाव येथील मा. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नरेंद्रभाऊ नेहते यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
कार्यक्रमास वाचनालयाचे सचिव योगेशभाऊ पाटील, माजी नगरसेवक नंदकिशोर पाटील, आदित्य योगेश पाटील, रघुनंदन वाघ, संजय बाविस्कर, जंगलू चव्हाण, पंडित मराठे, हरिसिंग जनकवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम शांत, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
#अण्णाभाऊसाठे #जयंती #धरणगाव #सार्वजनिकवाचनालय #ग्रंथालय #लेखनप्रेरणादिन #मराठीसाहित्य #सामाजिकपरिवर्तन #मराठीबातम्या
